*बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाचे सोशल डिस्टन्सिंग पाळुन साध्या पद्धतीने भूमिपूजन*



*आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते आज मंजूर येथील बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाचे सोशल डिस्टन्सिंग पाळुन साध्या पद्धतीने भूमिपूजन पार पडले.*
मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आतापर्यंत २ वेळा वाहून गेला होता. त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. पुढील शाश्वत कामाचा आराखडा तयार होईपर्यंत येत्या पावसाळ्यात पाणी अडवले जावे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून सदर दुरुस्ती कामाची मंजुरी मिळवली आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, अशोक तिरसे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, विठ्ठलराव जामदार, लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप आदी सोशल डिस्टन्सिंग पाळुन उपस्थित होते.
Previous
Next Post »