आळंदीत ४ हजार होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप
स्थानिक नगरसेवकांचा उपक्रम
आळंदी : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे गेल्या २ महिन्यां पासून पोलिस वर्ग हा रस्त्यावर २४ तास सर्व सामान्य नागरिकांसाठी सतर्क राहून कार्यरत आहे . कोरोना संसर्गा विरोधात सर्वांचीच लढाई राज्यासह देशात सुरू आहे.लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर असलेल्या दिघी व आळंदी वाहतूक पोलिस आणि देहू फाटा येथील वाहतुक पोलिसांना मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले,माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
आळंदीत मेडिकल व्यावसायिक असलेले नगरसेवक सचिन गिलबिले यांचे सामाजिक कार्यात योगदान कायम राहिले आहे. आळंदी दिघी वाहतूक पोलिस विभागातील तसेच देहुफाटा येथील वाहतुक पोलिसांना होमिओपॅथिक औषधे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीतील पोलीस, भाविक,वारकरी तसेच स्थानिक नागरीकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले. बंदोबस्तावरील पोलीस आपले आयुष्य धोक्यात घालून बंदोबस्त करीत आहेत.पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी ही औषधे देत असल्याचे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले
.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने या गोळ्या उपयुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. इतर देशांमध्ये या गोळ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाटल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या होमिओपॅथी गोळ्यांना फार महत्व आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे.त्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या म्हणून जाहीर केल्या आहेत. सुमारे ४ हजार गोळ्यांचे आळंदी परिसरात लोकांना वाटप करण्यात आले अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक सचिन गिलबिले आणि माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी दिली.
ConversionConversion EmoticonEmoticon