*आळंदी पंचक्रोशी दत्तक गावांत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप*



आळंदी पंचक्रोशी दत्तक गावांत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप 
आळंदी : येथील डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे  च्या वतीने  उन्नत भारत अभियानातंर्गत 5 गावे चऱ्होली खु , सोळू , वडगाव घे , कोयाळी, भोसे, दत्तक घेतली असून  प्रत्येक गावात 40 या प्रमाणे 200 जीवनवश्यक किट गरजु कुटुंबांना वाटप करण्यात आले.दत्तक गांव सोळू ग्रामपंचायत या ठिकाणी किट चे वाटप करून  कोरोना विषयी जनजगृती करून मास्क वाटप केलेे तसेच ग्रामपंच्यात कर्मचार्यांना आशा वर्कर याना मास्क व सॅनिटायझर वाटप केले.  या वेळी सरपंच कल्याणी ठाकूर,उपसरपंच, इतर सदस्य ग्रामपंचायत मधील कर्मचारी व डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज चे डॉ अमिताभ बॅनर्जी विभाग प्रमुख कम्युनिटी मेडिसीन, उन्नत भारत अभियान समन्वयक,  डॉ.श्यामकांत कुलकर्णी (मेडिकल ऑफिसर), डॉ योगेश कवाणे, जोसेफ चेरीयन (हेल्थ सुप्रिडेंट) ,लता खंदारे, प्रविण कोल्हे(वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते)संगीता ढवळे,कालिदास तापकीर , पंजाब वैरागड, रामदास भाकरे,अनंता शिंदे,तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
Previous
Next Post »