*अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक,पुर्व विभाग,गुन्हे शाखा,पुणे यांची मोठी कारवाई*





अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक,पुर्व विभाग,गुन्हे शाखा,पुणे बंद कालावधीचा गैरफायदा घेवुन देशी-विदेशी सिगारेट,गायछाप तंबाखु  चढया दराने विक्री करणा-या इसमावर गुन्हे शाखेकडुन कडक कारवाई
दि.23/05/2020 रोजी  चर्तु:श्रृंगी पो. स्टे हद्दीत इसम नामे भावेश समारामजी चौधरी,वय – 30 वर्षे, रा.व्हिडोज सोसायटी, फ्लॅट नं 9 बाणेर पाषाण लिकं रोड पाषाण पुणे याने उत्तम सुपर स्टोअर्स   काप्स भवन सोसायटी,सं नं 132/2  बाणेर पाषाण लिंक रोड पाषाण पुणे येथे कोव्हिड 19 विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने महाराष्ट्र व केंद्र शासनाने  मा.जिल्हाधिकारी पुणे व मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन, त्याचे नमुद दुकानामध्ये मध्ये वेगवेगळया कंपनीच्या देशी विदेशी सिगारेट, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ, असा एकुण कि रु 79,200/- चा माल विक्रीस ठेवुन त्या ठिकाणी ग्राहकांची खरेदी करण्यास, गर्दी होवुन कोरोना विषाणु चा पादुर्भाव वाढु शकतो हे माहिती असतानाही सदर देशी विदेशी सिगारेट, तंबाुखजन्य पदार्थ, विक्रीकरीता ठेवलेल्या असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द भा दं वि कलम 188, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे  कलम 51(ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम 2003 व नियम 2004 चे कलम 7(2),20(2) प्रमाणे गु र. नं 869/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दि.23/05/2020 रोजी  हडपसर पो. स्टे हद्दीत इसम नामे मुकुल सुनील भंडारी ,वय – 26 वर्षे, रा.रुक्मीणी निवास,आंबडण चर्च मागे,कृष्णानगर,लेन 22 घर नंबर 4 कोंढवा पुणे याने त्या ठिकाणी  कोव्हिड 19 विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने महाराष्ट्र व केंद्र शासनाने  मा.जिल्हाधिकारी पुणे व मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन, त्याचे नमुद दुकानामध्ये मध्ये वेगवेगळया कंपनीच्या देशी विदेशी सिगारेट, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ,गायछाप तंबाखु असा एकुण कि रु 85950/- चा माल विक्रीस ठेवुन त्या ठिकाणी ग्राहकांची खरेदी करण्यास, गर्दी होवुन कोरोना विषाणु चा पादुर्भाव वाढु शकतो हे माहिती असतानाही सदर देशी विदेशी सिगारेट, तंबाुखजन्य पदार्थ, गायछाप तंबाखु विक्रीकरीता ठेवलेल्या असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द भा दं वि कलम 188,269,270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे  कलम 51(ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम 2003 व नियम 2004 चे कलम 7(2),20(2) प्रमाणे हडपसर पो स्टे येथे गु र. नं 692/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री बच्चन सिंग, मा. सहा पो आयुक्त, अभियोग, श्री विजय चौधरी यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक, पुर्व विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहा. पोलीस निरीक्षक बापु रायकर, सहा पोलीस उप निरीक्षक दिलीप जोशी, प्रविण शिर्के, अविनाश शिंदे, अर्जुन दिवेकर, पो हवा राहुल जोशी, प्रफुल्ल साबळे, शिवाजी राहिगुडे, पोलीस नाईक विशाल शिंदे, रामचंद्र यादव, अमित छडीदार, योगेश मोहीते यांनी केली आहे.
Previous
Next Post »