"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ", या ब्रीद वाक्य प्रमाणे जर प्रामाणिकपणे इमाने-इतबारे कर्तव्य केल्यास आपल्याला नोकरीत कधीच अडचण येणार नाही. याच नुसार सुबराव शंकर लाड यांनी आपली ३८ वर्षांची सेवा पूर्ण केली समाजात पोलीस बांधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे परंतु आपल्या उत्तम कामातून सुबराव शंकर लाड यांनी सर्वांना एक चांगला आदर्श घालवून दिला आहे पोलीस दलात सेवेत असताना प्रत्येक जवाबदारी व्यवस्थित पार पाडत नवीन पिढीला देखली प्रेरणा देण्याचे काम केले.
सुबराव शंकर लाड यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांचा निरोप समारंभ कोरोना च्या पार्श्वभूमीवर छोटेखानी पद्धतीने करण्यात आला यामध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव साहेब विश्रामबाग विभाग पुणे शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी तसेच सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सत्कार करून निरोप समारंभ केला. सुबराव शंकर लाड यांनी कोरोना युद्धात देखील महत्वाची भूमिका बजावली
सुबराव शंकर लाड यांनी पोलिस दलात कशा प्रकारे काम केले त्याचा हा थोडक्यात आढावा
संपूर्ण नाव सुबराव शंकर लाड पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नगर पोलीस ठाणे पुणे शहर.मोबाईल नंबर -9764002841
जन्मतारीख 01/06/1962 मुळगाव :- मुक्काम किटवाड पोस्ट होसुर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर
सद्या:- संतोष नगर कात्रज पुणे
शालेय शिक्षण (1ली ते 3 री ) विद्या मंदिर किटवाड ता चंदगड जिल्हा कोल्हापूर.(4थी ते 10 वी ) सरस्वती विद्यामंदिर कालकुंद्री तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर (मूळ गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर, ).(11वी,12वी) बीएम रोटे जुनियर कॉलेज व महावीर कॉलेज कोल्हापूर.(B.A.) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शहर.
बालपणाबद्दल माहिती :- हालाखीचे गेले ( मध्यम वर्ग शेतकरी कुटुंबात ) कौटुंबिक पार्श्वभूमी आई वडील काय करतात :- शेती व्यवसाय (आई वडील सद्या हयात नाहीत )
पोलीस खात्यात कधी व का भरती झालात/ उद्देश:-
दिनांक 10/12/1982 ( आर्थिक चनचन, शिक्षण पूर्ण करण्याचे धेय व सरकारी नोकरी करण्याची ईच्छा )
कोण कोणत्या ठिकाणी नोकरी:- एस आर पी एफ, विशेष सुरक्षा विभाग ,पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे पोलीस आयुक्त पुणे शहर , व्ही एच एफ, येरवडा पोलीस स्टेशन ,बंडगार्डन पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलिस स्टेशन ,मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा पुणे शहर ,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, (विशेषता सर्व पोलीस स्टेशन ठिकाणी दप्तरी / तपास पथकात कामगिरी केली) ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणचे उल्लेखनीय अविस्मरणीय प्रसंग व विशेष बाबी:-
अविस्मरणीय प्रसंग तसे भरपूर आहेत.
आतापर्यंत आम्ही घरफोडी,रॉबरी, चोरी ,वाहनचोरी, प्रोब्हीशन मधिल असा 1,69,38,100/- रूपये चा माल हस्तगत केला.
तसेच वाहतूक विभागात विभागात काम करत असताना 14 92 ड्रिंक आणि ड्रायव्हिंग च्या केसेस करून 560 ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओ कडे पाठवून रद्द केले तसेच वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 17812 वाहन चालकावर केस करून 83,23,700/- रुपये दंड वसूल केला आहे.पोलीस खात्यात काम करताना आदर्श ठेवण्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहकारी व कनिष्ठ यांचे अनुभव:-
1. U.D.Rajwade (DIG)
2.Dr.k Venkatesham
( police Commissioner)
3.Ashok Morale (DIG)
4.Shirish Sardeshpande
(DCP)
5.Madhukar Mote (PI)
6. Ram Pathare (PI)
7. Sudham pacorkar (PI)
8. Dhanjay Solankar( Dysp)
9.Asi Viswas Surve
10. Pn Sandeep Jadhav & others
मुले मुली किती आहेत. काय करतात व त्यांच्या शिक्षणाकडे किती लक्ष देता आले:-मुलगी शितल - 33वर्ष (B com) (विवाहित) ,मुलगा - विवेकानंद (M.B.A. Marketing ) 27 वर्ष हॉटेल व्यवसाय चालवितो .( मुलांच्या शिक्षण आणि जडण घडणी मध्यें माझी पत्नी सौ मंगल हिचे फार मोठे योगदान आहे)पोलीस खात्यातील सेवेबद्दल काय सांगावेसे वाटते:- वरिष्ठ बद्दल चांगले-वाईटअनुभव:- माझे 38 वर्षाचे सेवेत सर्वच वरिष्ठ अधिकारी चांगले भेटले मला त्यांच्याकडून बरेच काही चांगले शिकायला भेटले. म्हणून मी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे काम केले. समाजाकडून /नातेवाइकांकडून चांगले-वाईट अनुभव:- आत्तापर्यंत केलेल्या नोकरीमध्ये समाजाची एक रूप होऊन नोकरी केल्याने मला कोणत्याही वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले नाही घडलेल्या कोणत्याही एखाद्या वाईट प्रसंगाच्या वेळी सर्व समाज माझ्या पाठीशी उभे राहिला. मी जिथे जिथे नोकरी केली तेथील लोकांशी संबंध चांगले ठेवून लोकांमध्ये मिसळून राहिल्याने माझा संपर्क मोबाईल नंबर लोकांकडे असल्याने व माझी त्यांच्याशी नाळ जुळाल्याने कोणतेही घटनेच्या पूर्वी मला सर्व माहिती मिळत गेली त्यामुळे मी चांगल्या प्रकारे काम करू शकलो .माझे सर्व नातेवाईक माझ्या कामावरती खुश असतात माझे नातेवाईकाशी संबंध खूप चांगले आहेत.
सेवानिवृत्त आयुष्यात पोलीस खात्यासाठी काय योगदान :- पोलीस खात्याविषयी मला नेहमीच अभिमान आहे आणि राहील. स्वतः काय करू शकता :- पोलीस खात्यातील नवीन अधिकारी-कर्मचारी यांना आपल्या 38 वर्षाच्या सेवेतील अनुभवा बाबत मार्गदर्शन करिता बोलविण्यात आले तर निस्वार्थपणे हजर राहून योग्य ते मार्गदर्शन देईन किंवा कोणत्याही महत्त्वाच्या गुन्ह्याच्या वेळी अगर वाहतूक नियमन करता हजर राहुल काम करिन. सेवानिवृत्तीनंतर आयुष्य कसे घालवणार आहात :- नेहमीप्रमाणे सकाळी वाकिंग, रनिंग, योगा आणि हास्य क्लब त्यानंतर मुलाच्या व्यवसायांमध्ये मदत करण्याचे ठरवले आहे.
पुढील आयुष्यात पोलीस व्हायला आवडेल का:- होय , नक्कीच आवडेल . सेवा कालावधीतील
बक्षिसे:-एकूण - 422
1. सन 2005 मध्ये पोलीस महासंचालक सो यांचे सन्मानचिन्ह मिळाले
2. सन 2006 मध्ये दोन आगाऊ वेतनवाढ मिळाले.
3. सन 20 11 साली राष्ट्रपती पदक मिळाले
पोलीस सेवेमध्ये असताना तुमच्या पत्नीने दिलेले योगदान :- माझ्या पत्नीने माझ्या कुटुंबाची आई-वडिलांची सेवा केली तसेच मुलांचे संगोपन शिक्षण याबाबत कधीही अडचण येऊ दिली नाही मुलांना चांगले संस्कार दिले जिवनात समर्थ साथ दिली काही अडचणीच्या वेळी समजून घेऊन साथ दिली त्यामुळेच मी पोलीस खात्याला वाहून जाऊन चांगल्या प्रकारे कर्तव्य केले .पोलीस खात्या विषयी थोडक्यात अभिप्राय:-पोलीस खाते एक चांगल्या प्रकारे समाज सेवा करण्याचे क्षेत्र होय.
ConversionConversion EmoticonEmoticon