*पालखी सोहळ्याच्या संदर्भात आळंदी संस्थानचे शासनाकडे तीन प्रस्ताव*



आळंदी / प्रतिनिधी : देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून या पार्श्‍वभूमीचे गांभीर्य लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळ्याचे  स्वरूप आणि नियोजन या संदर्भात श्री ज्ञानेनश्वर महाराज संस्थान  कमिटीने संबंधित घटकांसमवेत चर्चा करुन मते जाणून घेत तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत.मात्र अंतिम निर्णय राज्य शासन घेणार आहे.
 या बाबत देवस्थानने पत्रव्यवहार केला होता या संदर्भात सर्व दिंडीचालक/मालकांनी  मते आणि भुमिका मांडल्या आहेत . त्यानंतर पालखी सोहळ्यातील संबंधित असलेल्यां घटकांसमवेत  व्हिडिओ काँन्फरस द्वारे संपर्क साधला .१२ मे रोजी पुणे जिल्हाधिकारी यांच्या सोबत पालखी सोहळा संदर्भात बैठक झाली. त्यानंतर १३ मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवास येथे संस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, अजित कुलकर्णी,योगेश देसाई, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर पवार,, संस्थांनचे मानकरी ,सेवक चोपदार उपस्थित होते . या सर्वां बरोबर विचारविनिमय करून त्यांची सर्व मते जाणून घेऊन पुन्हा विश्वस्त मंडळ यांच्यात बैठक घेऊन तीन प्रस्ताव पालखी सोहळा नियोजन व स्वरुप या संदर्भात शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या मध्ये प्रस्ताव क्र.१ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणार्‍या प्रत्येक दिंडीतील १ विणेकरी यांचेसह सुमारे ४०० वारकर्‍यांसह नेहमीच्या पध्दतीने श्री माऊलींच्या चल पादुका रथा मध्ये विराजमान करुन सर्व वैभवासह सोहळा साजरा करणे. प्रस्ताव क्र. २ नुसार वारकरी एकंदर केवळ १०० व्यक्तींसह माऊलींच्या चल पादुका रथामध्ये विराजमान करुन सर्व वैभवासह सोहळा साजरा करणे. प्रस्ताव क्र.३ नुसार वारीची परंपरा खंडीत होऊ नये या दृष्टीने पायी प्रवास न करता श्री माऊलींच्या चल पादुका वाहनाऊनन ३० व्यक्तींसह सोहळा साजरा करणे असेे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng