*अमोघ सेवा संस्था सह्याद्री हॉस्पिटल व विराजदादा घुले कृष्णाई ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न*



कोरोना मुळे सर्व काही ठप्प झाले आहे कोरोना वर मात करण्यासाठी सर्वच जण आपल्या स्तरावर काम करत आहेत लॉक डाऊन मध्ये बऱ्याच गोष्टींवर निर्बंध आले आहेत अशातच हॉस्पिटल मध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे रक्ताची गरज भरून काढण्यासाठी अनेक संस्था सर्व सूचनांचे पालन करून रक्तदान शिबिर घेऊन मदत करत आहेत यातच अमोघ सेवा संस्था सह्याद्री हॉस्पिटल व विराजदादा घुले कृष्णाई ग्रुप यांनी बुधवारी श्री गणेश दत्त मंदीर, महेश सोसायटी बिबवेवाडी येथे रक्तदान शिबिर घेतले यामध्ये जवळपास ३४ बॅग रक्त संकलन करण्यात आले विराजदादा घुले यांनी या संकटाच्या काळात रक्ताच्या तुटवडा मुळे जिवीतहानी होवु नये यासाठी हा खारीचा वाटा उचला आणि हे रक्तदान शिबिर खुप चांगल्या रितीने संपन्न झाले

Previous
Next Post »