श्री दगडू रामा वडवेकर या ७६वर्ष वय असणाऱ्या निवृत्ती धारक ज्येष्ठ नागरिकांच्या आंबेगाव येथील राहत्या घरी अनेक दिवस लॉक डाऊन असल्याने एक ही पैसा शिल्लक नव्हता आणि बाहेर जाण्यास पोलीस परवानगी पाहिजे या अडचणीत त्यांनी आपले बिल्डिंग मधील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती जाधव यांना माहिती विचारली व माझी पेन्शन खडकी मध्ये असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत आहे आणि मला तर तेथे जाण्यासाठी पोलीस परवानगी आणि रिक्षा सुद्धा मिळणार नाही आता काय करू?
माझ्या घरात जे होते ते सगळे संपले आहे आणि बाजूच्या लोकांकडून तरी किती दिवस उसंन वारी करू .!असा प्रश्न विचारला,त्या वेळेस निवृत्ती जाधव यांनी त्यांचे स्नेही व दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले देविदास घेवारे यांना फोन लावून ही अडचण सांगितली त्या वेळेस क्षणाचा विलंब न लावता
त्यांनी सांगितले की,त्याना खडकी येथे जाण्यासाठी सर्व व्यवस्था करून देतो आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असणारे पोलीस कॉन्स्टेबल राहुल आवारी यांना सांगितले की,आपल्याला एक अडचणीत आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक हेतूने मदत करायची आहे आणि तू राहण्यास आंबेगाव येथे असल्याने उद्या सकाळी ड्युटी वर येताना दगडू रामा वडवेकर राहणार सर्वे नंबर ३४ वैष्णवी हाईट्स दत्तनगर आंबेगाव येथे जाऊन त्यांना भेटा व त्यांना खडकी येथिल बँकेत घेऊन जा व मदत करा.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश हा पोलीस विभागात शिरसावंद्य मानला जातो त्या प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल राहुल आवारी यांनी श्री दगडू रामा वडवेकर यांना घरातून स्वतःच्या दुचाकीवर बसवून खडकी बिजनेस सेंटर येथील पंजाब नॅशनल बँकेत नेले तेथे त्यांना बँकेची सर्व मदत करून पैसे काढून पुन्हा दत्तनगर येथे आणून सोडले
व दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील मध्य प्रदेश मध्ये जाणाऱ्या मजुरांच्या परत पाठवणीच्या मोहिमेत सहभागी होऊन पी एम पी एम एल बस घेऊन पुणे स्टेशन येथे गेले.या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सांगितले की,आजच्या लॉक डाऊन कालावधी मध्ये अनेक लोकांना विविध अडचणींला सामोरे जावे लागत आहे आणि अशा अडचणीच्या वेळेस जितक्या लोकांना मदत करता येईल तेवढ्या नागरिकांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.माननीय पोलीस आयुक्त श्री व्यंकटेशम साहेब यांनी
पोलीस
विभागासाठी"भावनिक प्रज्ञावन्त" याचे अनेक सत्र आयोजित केले असल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी आता आपला पूर्वीचा विचार बदलून जनतेच्या मदती साठी स्वतःहून पुढे येत आहेत.हा पोलीस विभागात सकारत्मक बदल दिसून येत आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon