करोना साथी बरोबर जनतेत आलेला भष्म्या रोग थांबल्यास दुकाने उघडता येतील- अँड.नितीन पोळ
सरकारने देशभर करोना साथीचा आजार थांबविण्या साठी लॉक डाऊन जाहीर केले मात्र जनतेची जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून आठवड्यातील तीन दिवस दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र करोना साथी बरोबरच जनतेत भष्म्या आजार देखील आला असल्याचे दिसून येत असून या तीन दिवसामध्ये जनतेकडून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होऊन लॉक डाऊन चा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे मात्र जनतेने हा भष्म्या आजार थांबल्यास निश्चित पणे दुकाने उघडता येतील अशा विश्वास वाटत
लॉक डाऊन जाहीर झाला आणि ज्यांच्या कडे पैसे आहेत अशा लोकांनी महिना भराचा तर काहींनी तीन तीन महिन्यांचा किराणा समान खरेदी केले या तीन दिवसात दुकाने सुरू झाली तरी अजूनही लोक दुकानावर गर्दी करून सामान खरेदी करत आहे त्यामुळे प्रशासनाला गर्दीवर आवर घालणे कठीण होत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे जर दर तीन दिवसांनी दुकाने उघडत आहेत व आजही सर्व जीवनावश्यक सामान उपलब्द होत आहे
तसेच बरेच दुकानदार व्हाट्स अप च्या माध्यमातून यादी मागून वस्तू पुरवत आहे एका बाजूला ज्यांना काहीच नाही ते मोफत अन्न छत्र मधून डबे मागवत आहे व मिळेल ते व मिळेल तसे खाऊन जगण्याचा प्रयत्न करत आहेत याउलट ज्यांच्याकडे पैसे आहे ते जीवनावश्यक वस्तू संपणारच आहेत अशा थाटात वस्तू खरेदीसाठी गर्दी करतात मात्र एक दोन दिवस एखादी वस्तू मिळाली नाही तर काही फरक पडणार नाही अशी तयारी केली व साथीच्या आजारा सोबत आलेल्या भष्म्या रोगास आवर घातल्यास प्रशासनावर ताण पडणार व दुकाने उघडण्यास मदत होऊ शकेल असे वाटते
ConversionConversion EmoticonEmoticon