*तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई*



कोविड-19 विषाणुचा  प्रार्दुभाव होवू नये या अनुषगांने  मा. पंतप्रधान, भारत सरकार  यांनी  दिनांक 24/03/2020 रोजी  भारत देशामध्ये लॉकडाऊन केला. त्यानंतर प्रथम 14 एप्रिल-2020 पर्यत व पुन्हा टप्प्या-टप्प्याने  दिनांक 03/05/2020 पर्यत लॉकडाऊन कायम केलेला आहे. या अनुषगांने लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होवू नये या अनुषगांने काही दुकानदार चढया भावाने किराणा मालाची विक्री करीत असल्यास तसेच जिवनाश्यक वस्तु वगळून इतर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असल्यास खात्री करुन कारवाई करणेकामी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर डॉ.के. व्यंकटेशम्  यांनी दिलेल्या आदेशानुसार  अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री. अशोक मोराळे व पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. बच्चन सिंह यांनी मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील युनिट/पथकाने खालील प्रमाणे कारवाया केलेल्या आहेत.सिंहगड रोड पो.स्टे.च्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना इसम नामे भवरलाल मिशरिलाल जाठ रा.वडगाव,पुणे यास पकडून त्याचे किराणा दुकानातून किं.रु.8512/-रु. किंमतीचा  वेगवेगळया कंपनीची सिगारेट पाकीटे व तंबाखू जप्त करण्यात आली आहेत सदर प्रकरणी सिंहगड पो.स्टे.गुरनं.1628/2020 भादंविक 188, 269,270,273, कोटपा कलम 7(2)20(2), आपत्ती व्यवस्थापन अधि.2005 चे कलम 51(ब),संसर्गजन्य रोग अधिनियम 1897 चे कलम 3, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना  सन-2020 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्रांतवाडी पो.स्टे.चे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना  श्रीराज फर्नीचर, एअर पोर्ट रोड या दुकानामध्ये इसम नामे सुधीर राजकुमार अगरवाल रा.गुरुकृपा कॉम्प्लेक्स, विश्रांतवाडी  हा आपले फर्निचर दुकानामध्ये तंबाख्ू विक्ररी करताना मिळून आल्याने त्याचे कब्जातून एकुण 14400/-रु.चे गायछाप तंबाख्ूचे पुडे जप्त करुन त्याचेविरुध्द विश्रांतवाडी पो.स्टे.गुरनं.553/2020 भादंविक 188,269,270,आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(ब) अन्वये गुंन्हा दाखल करण्यात आला आहे.चतुश्रृंगी पो.स्टे. चे  हद्दीत पेट्रोलींग करीत असताना इसम नामे नरेंद्र मिश्रा रा. शिवाजीनगर,पुणे याचे ताब्यातून  वेगवेगळया प्रकारची सिगारेट पाकिटे कि.रु.29700/- रु.ची  व ज्युपिटर मोपेड कि.रु.70,000/- असा माल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी चतुश्रृंगी पो.स्टे.गुरनं. येथे भादंविक 188,269,270 व सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 व नियम 2004 चे कलम 7(2) व 20(2) तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  सन-2005 चे कलम 51(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानवडी पो.स्टे.चे हद्दीत इसम नामे लिकायत अली शौकत मुल्ला हा जिवनाश्यक वस्तूंबरोबर चोरुन सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची  विक्री करताना मिळून आलेने त्याचे ताब्यातून सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ एकुण 13,045/- रु. किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी वानवडी पो.स्टे. येथे भादंविक 188,269,270, महाराष्ट्र कोवीड 19 उपाययोजना  नियम 11 व सिगारेट व अन्य तंबाख्ू उत्पादने कायदा 2003 वे कलम 7(2),  20(2) व संसर्गजन्य रोग अधि.1897 चे कलम 3  अन्वये गुंन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील प्रमाणे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असले बाबत  एकुण चार इसमाविरुध्द कारवाई करण्यात आली असून त्यांचे ताब्यातुन कि.रु. 65657/- चा सिगारेट पाकीटे, गायछाप तंबाख्ू पुडे असा माल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही चढया भावाने किराणा मालाची विक्री करणारे दुकानदार तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-या इसमांवर करडी नजर ठेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे सत्र चालू राहणार आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng