*देशसेवेचा दुहेरी संगम 10 हजारांचे मास्क वाटप*



कोरोनाच्या महाभयंकर वैश्विक महामारीच्या काळात सातत्याने व अतिशय कटीबद्द असणारे आपले काही पोलीस बांधव कोरोनाच्या युद्धात स्वतःच्या जीवाची तसेंच आपल्या परिवाराची सुरक्षितता प्राणपणाला लावून अत्यंत कर्तव्यदक्ष पणे आपले कामं करीत आहेत  या देशसेवेच्या कार्यात आतापर्यंत काही पोलीस बांधवाना आपला जीव गमवावा लागला. खरी देश सेवा काय असते हे एक योद्धाच ओळखू शकतो आणि म्हणून सध्या काश्मीर मध्ये 5 राष्ट्रीय रायफल मध्ये कर्तव्यावर असणारे बॉम्बे शेपर्स चे नायक कुणाल आप्पासाहेब बिरारी यांनी पोलिसांप्रती आपली देशसेवा ओळखून पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी वाहतूक पोलीस यांना 10 हजारांचे मास्क व handglows(हातमोजे ) यांचे मोफत वाटप कार्यासाठी आपले आर्थिक योगदान दिले. आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे कुणाल बिरारी यांचे पोलीस बांधवानी अगदी मनापासून कौतुक केले. मास्क व हॅन्डग्लोज चे प्रांत पोलीस मित्र संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी लायन्स क्लब चे प्रशांत कुलकर्णी श्रीकांत घोडके शांतता कमिटीचे सुभाष मालुसरे लक्ष्मण पाटील वैभव पाटील यांनी संपूर्ण शहरांत वाटप केले. 
Previous
Next Post »