मांसहार विक्रीच्या वेळेत बदल करावा



कोपरगाव नगर पालिका प्रशासनाने आज विविध दुकाने उघडण्याचे वेळापत्रक जाहीर केले असून मांसाहार विक्री शनिवारी सुरू ठेवल्याचे दिसून येते मात्र नगर पालिकेने मांसाहार विक्रीच्या वेळेत बदल करावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की महाराष्ट्रीयन नागरिक सर्व साधारण रविवार, बुधवार व  शुक्रवार असे तीन दिवस अंडी, मटण मासे असा मांसाहार करत असतो इतर दिवशी मात्र धार्मिक कारणामुळे शक्यतो मांसाहार करणे टाळत असतो या बाबत नगर पालिका प्रशासनाला देखिल जाणीव आहे असे असताना दुकाने सुरू करण्याच्या यादीत चिकन, मटण, मासे यांची दुकाने शनिवारी सुरू ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे  त्या मुळे अनेक ग्राहक नाराज झाले मात्र शनिवारी मांसाहार विक्रीची दुकाने सुरु ठेवल्यास त्याचा फटका विक्रेते व खवय्ये या दोघांनाही बसणार आहे त्या मुळे नगर पालिकेने मांसाहार विक्रीच्या दुकाने सुरू करण्याच्या दिवसात बदल करावा व सदर दुकाने रविवारी सुरू ठेवावी अशी मागणी या केली असून या पत्रकावर सोमनाथ म्हस्के किरण अढांगळे, राजू रोकडे, सुजल चंदनशिव ,गोपीनाथ ताते,  दिलीप कानडे, अमित आगलावे अजय विघे आदींच्या सह्या आहेत
Previous
Next Post »