*सलुन व्यावसायिंकावर आली उपासमारीची वेळ प्रशासनाने याची दखल घ्यावी*



*सलुन व्यावसायिंकावर आली उपासमारीची वेळ प्रशासनाने याची दखल घ्यावी.  तहसिलदारांना निवेदनाद्वारे माहिती दिली तालुकाध्यक्ष दिलीप जाधव.* कोरोना व्हायरसमुळे शासनामार्फत घेतलेला लॉकडाऊन २२ मार्च २०२० पासुन संपूर्ण भारत भर जमाव बंदी व संचारबंदीच्या आदेशामुळे त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. सलुन व्यवसायावर अवलंबून असणारा हा सलुन कारागिर वर्ग भुमिहीन असुन या व्यवसायाव्यतिरीक्त त्यास उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. आजरोजी त्यांच्या कुटूंबावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या माध्यमातून सलुन व्यवसायावर अवलंबून असणार्या सलुन व्यवसायिकांचे दुकान चालू करण्यात यावे तसेच शासनांच्या सर्व नियमांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. तरी मे. साहेबांना नम्र विनंती की सलुन दुकान चालू करणेबाबत योग्य तो विचार करण्यात यावा ही विनंती.... *१)श्री.किरण बिडवे :- जिल्हाध्यक्ष , २)श्री.दिलीप जाधव :- तालुकाध्यक्ष ,  ३)श्री.विलास अनर्थे :- कार्याध्यक्ष , ४)श्री.प्रितम कदम :- प्रसिद्धी प्रमुख , ५)श्री.दिपक चव्हाण :- तालुका संघटक , ६)श्री.गोपीनाथ जाधव :- तालुका संघटक , ७)श्री.आदिनाथ वाघ :- तालुका संघटक , ८)श्री.प्रविण आहेर :- तालुका सचिव , ९)श्री.दत्तात्रय आहेर :- तालुका उपाध्यक्ष , १०)श्री.मनोज बिडवे :- जिल्हा उपाध्यक्ष.*  
तहसिलदारांना निवेदन देण्यासाठी नाभिक समाजातील पदाधिकारी हजर होते.
Previous
Next Post »