मदतीचा हात देणारे देवदूत
कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्येहातावर पोट असणारी अनेक कुटुंबं आपल्या मूळगावी-आपल्या लोकांकडे जाण्यासाठी धडपड करत आहेत. आपली शासनव्यवस्था या सगळ्यांना सुखरूप आपापल्या ठिकाणी पोहोचविण्याचे प्रयत्न करतच आहे. हे सगळे प्रयत्न सुरू असतानाही ही कुटुंब भीतीपोटी काही धाडसी निर्णय घेतात. पोटासाठी महाराष्ट्रात आलेली कुटुंबंमिळून आपल्या गावी पोहोचण्याचे ठरवतात. सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. पण आपलं पोलीसखातं,आपले पोलीस कर्मचारी अगदी तत्परतेने अशा लोकांनाही आपापल्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था करीत आहेत.
पुण्याचे पोलीस
सहआयुक्तडॉ.रवींद्रशिसवेपरराज्यातीलमजुरांना महाराष्ट्राच्या सीमांपर्यंत घेऊन जाणाऱ्याबसगाड्यांची व्यवस्था पाहण्यासाठीवाघोलीला गेले होते. हे काम पूर्ण करून ते संध्याकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगरयेथील कार्यालयाकडे चालले होते. तेव्हा येरवड्याच्याशाहादावल बाबा दर्ग्यापाशी त्यांना एक कुटुंब पायी चालत जाताना दिसलं. एक जोडपं आणि त्यांची पाच मुलं, असं ते कुटुंब होतं. त्यातलंएक मूलतर अगदी तान्हं होतं. त्यांना पाहून शिसवे सरांनी ताबडतोब गाडी थांबवायला सांगितली आणि उतरून त्यांची चौकशी केली. हे लोकमूळचे झारखंडचे असून ते खराडीहूनबालेवाडीला चालले आहेत,अशी माहिती मिळाली. बालेवाडीला त्यांच्याच प्रांतातले आणखी काही लोक त्यांना भेटणार आहेत आणि तिथून ते पुढे झारखंडला जाणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. शिसवे सरांनी ते कसे जाणार आहेत, व्यवस्था काय आहे, त्यांच्याकडे मेडिकल रिपोर्ट आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी केली.
हे कुटुंब खराडीहून दुपारी चार वाजता निघालं होतं आणि तीन तासांत मजल-दरमजल करत फक्त येरवड्यापर्यंत पोहोचलं होतं. अशा प्रकारे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेलंहे चौथं कुटुंबत्या दिवसभरातशिसवे सरांना भेटलं होतं. सरांनी त्यांनाआपल्याकडीलबिस्किटांचे पुडे आणि पाणी दिलं;गाडीत ठेवलेले मास्कही दिले. घाईघाईने कोणताच निर्णय न घेता त्यांनी शासनाच्या कॅम्पमध्ये जावं आणि तिथून त्यांना ट्रेनने किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने त्यांच्या गावी पोहोचविण्यात येईल, या गोष्टीची खात्रीपटवून दिली. त्याच वेळेस रस्त्यावरून पोलीस डिपार्टमेंटची एक जीप जात होती. ती जीपथांबवून त्यांना कॅंपमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. तिथे पोहोचल्यानंतर त्या जीपच्याड्रायव्हरने त्या कुटुंबाला एका दुकानातून काही खाद्यपदार्थ घेऊन दिले. त्यांची जेवणाची व्यवस्था आहे ना, याची चौकशी केली. त्यांच्याबरोबर येणाऱ्या कुटुंबांना काही अडचण आल्यामुळे ती कुटुंबंत्यांच्या ठरलेल्या ठिकाणी येऊ शकली नव्हती. तेव्हा त्यांच्यापैकी एकाचा नंबर घेऊन त्यांनाही कॅम्पमध्येआणण्याची सोय करण्यात आली.
संकटकाळात मदतीचा हात पुढे करणारे हे पोलीस कर्मचारीआणि अधिकारी नागरिकांसाठी देवदूतच ठरत आहेत.ज्यांना आपल्या गावी जायचं आहे,असे कित्येक जणरोजगस्त घालताना त्यांना भेटतात. पोलीस कर्मचारी नियमांचे पालन करून अशा लोकांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न करत आहेतच; शिवायवेळप्रसंगी वैयक्तिक मदतही करत आहेत. शिस्तीचे-नियमांचे पालन करणाऱ्या या खाकी वर्दीमध्येच आपल्या समाजासाठी झटणारे देवदूत दडले आहेत, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. त्यांचे श्रम, प्रयत्न आणि माणुसकी यांना तोड नाही.
ConversionConversion EmoticonEmoticon