महाळुंगे ग्रामपंचायतीच्या वतीने मजूरांना जेवण.
औंध, लाॅकडाऊनमुळे महाळुंगे (पाडाळे) ग्रामपंचायत हद्दीत अडकून पडलेल्या मजूर कुटुंबांच्या जेवणाची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.जवळपास तीन हजार जणांना रोज सकाळी घरपोच जेवण वाटप केले जात आहे.यासाठी नाद फक्त गडांचा ग्रुपचे सर्व सदस्य, गावातील दानशूर व्यक्तींकडून धान्य पुरवण्यात आले असून अजूनही पुरवले जात आहे.यातून अनेक गरजू व्यक्तींच्या जेवणाची सोय केली जात आहे.
महाळुंगे हद्दीत रोजंदारीवर काम करणारे अनेक मजूर राहत असून राज्यातील मराठवाडा, विदर्भ, सोलापूरसह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातून आलेल्यांची संख्या येथे मोठी आहे.रोजगार नसल्याने अनेक कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने या नागरीकांच्या जेवणाची सोय करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच दिवसापासून ही सेवा चालू असून लाॅकडाऊन संपेपर्यंत ही अन्न पुरवठा सेवा अखंडपणे चालू राहणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
ConversionConversion EmoticonEmoticon