पोउपायुक्त श्री बच्चन सिंह सर यांना माहिती मिळाली होती की what's Hot या वेबसाईटवर मोबाईल.न. टाकून हुक्कयाची जाहिरात देऊन हुक्का विक्री होत आहे सदर माहितीच्या आधारे मा. ACP श्री शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या मोबाईल नबरचे आधारे तांत्रिक विश्लेषण करून बनावट ग्राहक द्वारे psi महाडिक, पो हवा मगर ,गुरव गरुड ,पो ना साबळे, चौधर यांचेसह धर्मादास लुल्लागार्डन लुल्ला नगर कोंढवा तालाबचौक या ठिकाणी सापळा रचून हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या ३ इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) मित विजय ओसवाल वय १९ रा. वानवडी बाजार पुणे.२) रॉयल जयराम मधुरम वय -२८ रा. लुल्लानगर कोंढवा.३) परमेश महेश ठक्कर वय २४ रा. भवानी पेठ पुणे.
अशी असल्याची सांगितली यांची पंचासमक्ष झडती घेतली असतात्यांच्याकडे *६ हुक्का पॉट,६ पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर,४ मोबाईल फोन, २ मोपेड गाड्या असा एकूण ८४१००/-रुपयांचा* मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी भा.दं.वि क. १८८, २६९, २७०,२७३ , कोटपा अॅक्ट ५,७,२२,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे क. ५१(१)(ब), महाराष्ट्र कोविड १९ नियम २०२० चे क ११, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ चे क. ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
Subscribe to:
Post Comments (Atom)
ConversionConversion EmoticonEmoticon