*अखेर मा.आ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश...!*
*कोपरगाव शहरातील व्यापा-यांना प्रचंड मोठा दिलासा...!*
गेल्या ५० दिवसांपासून सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे शहरातील व्यापारी,दुकानदार,कामगार,हातावर रोजंदारी असणा-या कारागिरांचे प्रचंड हाल होत होते.आणि शहरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण अतिशय कमी होते.त्यामुळे सर्व नियमांचे पालन करुन शहरातील व्यापार काही प्रमाणात सुरु करण्यासाठी सर्व स्तरातील व्यापारी यांनी आमदारताईनी विनंती केली होती.त्यानुसार बुधवार दिनांक.०६/०५/२०२० व सोमवार दिनांक.११/०५/२०२० रोजी मा.तहसिलदार साहेब यांच्या दालनात मिटींग झाली होती.
त्या मिटींगमध्ये *जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सो व जिल्हाधिकारी सो राहुल द्विवेदी* यांच्याशी सखोल चर्चा करुन काही प्रमाणात बाजारपेठ सुरु करण्याची परवानगी मागितली होती.त्याचवेळी मा.जिल्हाधिकारी यांनी दोन-तीन दिवसांत कोपरगाव शहरातील बाजारपेठ सुरु होईल अशी खात्री दिली होती. त्यानुसार *उद्या गुरुवार दिनांक. १४/०५/२०२० रोजी कोपरगाव शहरातील बाजारपेठ सुरु होणार आहे.त्यामुळे मा.आमदारताईचे व प्रशासनाचे शहरवासीयांतर्फे खुप खुप आभार..आपले नम्रयोगेश तुळशिदास बागुलउपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद
ConversionConversion EmoticonEmoticon