*कोपरगावात ३५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन ३६ व्यक्तींना घरी सोडण्यात आले.*
कोपरगाव:- परराज्यातून, परजिल्ह्यातुन व तालुक्याबाहेरुन आलेल्या व्यक्तीस प्रथम १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे व त्या नंतरच त्यांना घरी जाता येणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत ३५२ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे. संस्थात्मक क्वारंटाईन चा १४ दिवसाचा कालावधी पुर्ण केलेल्या ३६ व्यक्तींना सुखरुप त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. सध्या क्वारंटाईन असलेल्या ३५२ व्यक्तींची ज्या-त्या गावात शाळा , अंगणवाडी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोपरगाव तालुक्यात १० एप्रिल नंतर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. कोपरगाव तालुक्याने २८ दिवस ओलांडून दुसरी साखळी तोडली आहे .
हि आनंदाची बाब आहे यात तालुक्यातील जनतेने प्रशासनास सहकार्य केल्याचे फलित आहे. यामध्ये प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेविका , आरोग्य सेवक , आरोग्य सहाय्यक स्त्री / पुरुष , आशा व अंगणवाडी सेविका , ग्रामसेवक , सरपंच , पोलिस पाटील , यांनी उत्स्फूर्तपणे अतिशय मोलाची कामगिरी केली आहे .
याबदल या सर्वांचे पंचायत समिती सभापती श्रीम. पौर्णिमा ताई राहुलराव जगधने , उपसभापती श्री. अर्जुनराव प्रभाकर काळे , पंचायत समिती सदस्य सर्व आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश आबा परजणे (शिंगणापूर गट) , श्री. सुधाकरराव दंडवते (चासनळी गट) , श्रीम. विमलताई आगवण (दहिगाव बोलका गट) , श्रीम. सोनाली ताई रोहमारे (पोहेगाव गट) व श्रीम. सोनाली ताई साबळे (संवत्सर गट) यांनी अभिनंदन केले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon